उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर: चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. चांदीचे दर पाहिले तर सध्या गगनाला भिडले आहे. चांदीचे दर पाहिले तर चांदीने चांगलाच भाव खाल्ला असून दोन लाख दर पार केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी हात आकडते घेतले आहे तर काहींनी याकडे गुंतवणूक म्हणून देखील पाहिले असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.
चांदीच्या जागतिक बाजारपेठेतील दर पाहिले तर उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणार्या हालचालीचा परिणाम आहे. तसेच इलेक्ट्रीकल व्हेकलची वाढती मागणी तसेच सोलर पॅनलचे वाढती मागणी याचाही परिणाम चांदीची मागणी सर्वाधिक आहे. मागणी जास्त आणि चांदी कमी अशी परिस्थिती सध्या बाजारपेठेत आहे. त्यात चीन मध्ये सर्वाधिक होणारी चांदीची खरेदी याचाही परिणाम सध्या चांदीवर झाला आहे. चांदीचे दर त्यामुळे सध्या वाढतच चालले आहे. चांदीने तब्बल दोन लाखांचा आकडा पार केल्याने ग्राहकांच्या खर्चात देखील यामुळे चांगलीच भर पडणार आहे. गुंतवणूकदारांसाठी मात्र दरवाढ फायद्याची ठरत आहे. त्यामुळे ज्यांनी चांदीमध्ये आधीच गुंतवणूक केली आहे ते आणखी दर वाढतील का यावर लक्ष ठेवून आहेत.
यामुळे वाढले चांदीचे दर
चांदीचे वाढते दर पाहिले तर दोन लाखांचा आकडा पार केला आहे. दर वाढीचे कारणे पाहिले तर इंडस्ट्रीमध्ये चांदीची वाढती मागणी यामुळे देखील दरवाढ झाली आहे. तसेच इलेक्ट्रीकल व्हेकलला चांदीचा वापर केला जातो तसेच सोलर पॅनलसाठी देखील चांदीचा वापर होतो. त्यामुळे इलेक्ट्रीकल व्हेकल आणि सोलर पॅनल यामुळे चांदीची मागणी सर्वाधिक होत आहे. तसेच सध्या एआय तंत्रज्ञानचा वाढता वापर यामुळे देखील चांदीची गरज भासू लागली आहे. एआय तंत्रज्ञानासाठी लागणार्या रोबोटसाठी देखील चांदीचा वापर व्हायला लागला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चांदीची सध्या गरज भासत आहे. चीनमध्ये सर्वाधिक चांदीची मागणी केली जात आहे. या सर्व आंतरराष्ट्रीय मार्केटचा परिणाम चांदीवर झाला असून चांदीचे दर वाढत चालले आहे.
सराफा मार्केटमध्ये मात्र खरेदीवर परिणाम: राजेंद्र मंडलिक
चांदीचे दर वाढत चालले आहे त्यामुळे अनेकजण गुंतवणूक म्हणून याकडे पाहत आहे. अनेकांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे. परंतु वाढते दर पाहता आणखी चांदीचे दर वाढतील का? याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे सराफा मार्केटमध्ये मोडीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बाजारपेठेत ती चांदी देखील येणे थांबली आहे. तसेच खरेदी करणार्याना भाव परवडणारे नाही त्यामुळे त्यांनी देखील किरकोळ खरेदीवरच काम भागविले जात आहेत. त्यामुळे देखील चांदी खरेदीवर परिणाम झालेला दिसतो. सराफा मार्केटमध्ये चांदीच्या दरवाढीचा ५० टक्के परिणाम झाला असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी स्पष्ट केले.